पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क :
संभाजी भिडे सध्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरात चर्चेत आहेत. यावर अनेक क्षेत्रातून आणि राजकीय संघटना पक्षांकडून राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. आज लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान सोहळ्यानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
ते म्हणाले कि, भिडेंची वक्तव्य खपवून घेणार नाहीत. बेताल वक्तव्यांप्रकरणी पोलीस भिडेंवर योग्य कारवाई करतील.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे लोकांमध्ये संताप तयार होतो. दरम्यान यासंदर्भात उचीत कारवाई राज्य सरकार करेल, असेही ते यावेळी म्हणाले. महात्मा गांधीबद्दल अपमानकारक वक्तव्य कुणीही करु नये. भिडेंच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले. तसेच भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.