अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य, आम्ही फक्त ‘या’ कारणासाठी एकत्र आलोत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खूप मोठा राजकीय भूकंप घडवत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. आता नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्यामागचं कारण अखेर स्पष्ट केलं आहे. गडचिरोलीतील एका शासकीय कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकार सोबत हातमिळवणी करत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचे सरकार का स्थापन केले. यावर त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

काय होते कारण?
अजित पवार यांनी सत्तेत सामील सामील होण्यामागचे कारण सांगतांना स्पष्ट म्हंटले आहे की, “सरकारमधील महत्वाचे वरिष्ठ नेते गडचिरोलीचे जबाबदारी घेत आहे. आधी आर आर पाटील (R R Patil) नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आता फडणवीस पालकमंत्री आहेत. उद्धिष्ट एवढेच आहे की इथला विकास होऊन नक्षलवाद नाहीसा झाला पाहिजे. भाजप, शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झालं आहे. आम्ही फक्त विकासासाठी सरकारमध्ये गेलो आहोत. कोणी काहीही बोलत असले तरी आम्ही विकासाठीच एकत्र आलो आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.