मनोज मुंतशीर यांनी जनतेची माफी मागितली

0

मुंबई – “‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे मी समस्त जनतेच्या भावना दुखावल्या आहेत हे मला मान्य आहे. माझे सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आदरणीय साधू-संत आणि प्रभू श्रीरामाचे भक्त यांची मी हात जोडून क्षमा मागतो. भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!” असे ट्वीट करत मनोज मुंतशीर यांनी जनतेची माफी मागितली आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटातील संवाद आणि पोशाखांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील काही संवाद बदलण्यातही आले होते.

त्यानंतरही अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉगमुळे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आला. या वादानंतर आता मनोज मुंतशीर यांनी हा जोडून प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.