चार्जिंगला लावलेला मोबाईल ने घेतला अचानक पेट आणि झाला स्फोट

0

जळगाव;- शहरातील गणेश कॉलनी परिसरात एका चहा विक्रेत्याच्या दुकानांमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल अचानक पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली यात मोबाईल चे पूर्ण नुकसान झाले आहे

शहरातील गणेश कॉलनी परिसरात किरण पाटील यांचे चहा विक्रीचे दुकान असून दुकानात त्यांच्या पत्नीने लावलेला मोबाईल ने अचानक पेट घेतल्याने त्यांनी तो खाली फेकून दिला थोड्याच वेळात त्या मोबाईलचा स्फोट झाला यामुळे थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला होता पाच सहा वर्षांपूर्वी घेतलेला सहा ते सात हजाराचा एमआय कंपनीचा हा मोबाईल असल्याचे किरण पाटील यांनी सांगितलं दरम्यान या प्रकारानंतर कुठलेही दुर्दैवी घटना घडली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.