मोठी बातमी; अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आजचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उदघाटनाची आयोजन करण्यात आले होते. तसेच, ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. याचवेळी त्यांच्या याच दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मराठा समाजाच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.