धक्कादायक; पत्नीसह मुलाला संपवून आरोपी व्यावसायिक फरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षांच्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण शहरात घडली आहे. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याची कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने दुकाने आहेत. दिपकने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील दीपावली इमारतीत दीपक त्याची पत्नी अश्विनी आणि सात वर्षांचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. दरम्यान आज दुपारी त्याच्या नातेवाईकाला फोन करून पत्नी व मुलाची हत्या केली. तसेच स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतांना आढळून आला. नातवाईकांनी दिपक चे घर गाठले असता त्यांना घरातील दृष्य पाहून धक्काच बसला. अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. तर दीपक पसार झाला होता .

या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अश्विनी व आदिराजाचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. दिपकची कल्याण शहरात नानूस वर्ल्ड नावाने महागड्या खेळण्यांची दुकाने आहे. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसात तपास सुरु आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असून, त्याने असे कृत्य का केले? हे त्याच्या अटकेनंतरच उघड होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.