मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आताची मोठी बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण ?
लोवर परळ येथील डिलाई रोड ब्रिज लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एन एम जोशी पोलिस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आलीये. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. उशिरा रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी आदित्य ठाकरेंकडून डिलाई ब्रिज रोडच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आले होते. या लेनचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे बेकायदेशीर आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काम पूर्ण झालेलं नसताना लेनचं उद्घाटन झालंय असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काही दिवसानंतर ही लेन सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन होते. त्याआधीच आदित्य ठाकरे यांच्याकडून लेनचे उद्धाटन करण्यात आले आणि वाहतूक सुरु करण्यात आली होती.