धक्कादायक; चीनच्या ड्रग्समुळे अमिरिकेत ७० हजार लोकांनी गमावले प्राण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे फेंटानिल नावाच्या ड्रग्सचे उद्पादन बंद करण्याची मागणी अमेरिकेने केली होती. यानंतर आता चीनने ही मागणी मान्य करत याचे उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असं आश्वासन दिल आहे. या ड्रग्समुळे अमेरिकेत गेल्या वर्षात तब्बल ७० हजार जणांचा बळी गेला होता.

फेंटानिल हे एक सिंथेटिक ड्रग आहे. यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे 619 जणांचा बळी गेला आहे. या ड्रगला चायना टाऊन, चायना व्हाईट अशा नावांनी देखील ओळखलं जातं.

औषध म्हणून सुरुवात
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंडरोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिल हे एक सिंथेटिक ओपिऑईड आहे. 1998 साली अमिरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याचा पेनकिलर म्हणून वापर सुरु केला होता. यासोबतच कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. फेंटानिल हे मॉर्फीनपेक्षा 100 पटींनी तर हेरॉइनपेक्षा 50 पटींनी अधिक प्रभावी आहे.

ड्रग म्हणून वापर
याच फेंटानिलचा वापर दुसरीकडे ड्रग म्हणूनही केला जातो आहे. याच्या अतिसेवनाने अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातो. फेंटानिल हे लिक्विड, पावडर आणि गोळ्यांच्या स्वरुपात देखील उपलब्ध होतं. आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रुपातही हे उपलब्ध होतं. त्यामुळेच याची तस्करी आणि वापर हा चिंतेचा विषय बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.