हनुमानासाठी ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान राखीव ठेवण्यात येणार एक सीट

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष हा २०२३ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून देशवासीय वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेमतेम दोन आठवडे शिल्लक असताना निर्मात्यांनी प्रमोशनचा शेवटचा टप्पा सुरू केला आहे. नुकतीच आदिपुरुष टीमने रिलीज संदर्भात एक घोषणा केली. आदिपुरुषच्या टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे आसन लोकांच्या श्रद्धेसाठी भगवान हनुमानाला समर्पित केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.