शिवछत्रपतींच्या ३५० व्या राज्याभिषेकाने घडविला इतिहास, वाचा सविस्तर

0

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आज छत्रपती शिवाजी महारांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. ह्या सोहळ्याने जणू एक रेकॉर्डच केला असं म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. रायगडाच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक गर्दी शिवभक्तांनी केली होती. त्याचदरम्यान सोहळा संपन्न झाल्यानंतर मोठी गर्दी गडउतार होत असतांना पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.

गर्दी एवढी होती कि किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. महाड ते रायगड या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली. अनेक शिवप्रेमींना वाहने परत फिरवावी लागल्यामुळे शिवराज्याभिषेक पाहता न आल्यामुळे नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे.

या सर्व घडामोडी युवराज संभाजी राजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या कानावर पडल्या असता त्यांनी शिवप्रेमींना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज एनचे दर्शन घेता यावे व त्यांना अभिवादन करता यावे यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन समस्येचे निराकारण करण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.