राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत येण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. नुकताच राखी सावंत हिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. तिचा नवरा आदिल खान दुर्रानीचे (Adil Khan Durrani) विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राखीने केला असून तिने त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आज सकाळी राखीच्या लोखंडवाला येथील राहत्या घरातून आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आदिलने गर्लफ्रेंड तनूसाठी राखीला तिच्यासोबतचे नाते तोडणार असल्याची धमकी दिली आहे. सोबत आदिलने आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार राखीने पोलिसांत केली आहे.पोलिसांनी आदिलला भांदवी कलम 406, 504 323 506 अंतर्गत ताब्यात घेतले असून त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

आदिलवर राखीचे गंभीर आरोप

आदिलवर राखीने अनेक आरोप केले आहेत. आईच्या उपचारासाठी वेळेवर पैसे न दिल्याचे म्हणत तिच्या मृत्यूला आदिल जबाबदार असल्याचे राखी म्हणाली आहे. शिवाय आदिलने मारहाण केल्याचा आरोपही तिने केला. याबरोबरच माझ्याकडचे पैसे आणि माझे दागिनेही आदिलने घेतल्याचा खुलासा राखीने केला. आदिल मला सोडून त्याची गर्लफ्रेंड तनुकडे राहायला गेल्याचेही राखी म्हणाली.

राखीने जाहिर केले आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव

दरम्यान राखी सावंतने माध्यमांसमोर येत आदिल खानच्या गर्लफ्रेंडचे नाव लोकांसमोर उघड केले आहे. आदिल तनू नावाच्या मुलीच्या प्रेमात असून तिच्यासाठी आपल्याला सोडत असल्याचे राखी म्हणाली आहे. याशिवाय आदिलने मारहाण केल्याचेही राखीने सांगितले. राखी जेव्हा मराठी बिग बॉसमध्ये होती त्यावेळी या दोघांचे अफेअर सुरू झाल्याचे राखीने सांगितले आहे. पाच आठवड्यांनंतर जेव्हा ती बिग बॉसच्या घरातून बाहेर आली तेव्हा तिला याबद्दल समजले. दरम्यान तिने त्यानंतर आदिलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच वेळी तिची आई आजारी होती. पण राखीच्या म्हणण्यानुसार अदिलने तिचे म्हणणे अजिबात ऐकले नाही.

आदिलविरोेधात म्हैसूर येथेही गुन्हे दाखल

अलीकडेच राखीचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात तिने आदिल खानविरोधात कर्नाटकमधील म्हैसूर येथे अनेक गुन्हे दाखल असल्याचे राखीने सांगितले होते. आदिलला पोलिस 1 तारखेला उचलून घेऊन गेले होते. त्याला म्हैसूरमध्ये दोन दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच्याविरोधात तिथे अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा राखी सावंतने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.