लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रम

0

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल आकर्षण

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी, महात्मा गांधी उद्यान येथे सायंकाळी ७ ते १० वाजेदम्यान स्वरस्वती या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणीही चुकवू नये असा या संगीतमय स्वरस्वती कार्यक्रमासाठी मंगेशकर घराण्यातील आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि सोबत प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांच्यासह सह गायक जितेंद्र अभ्यंकर आणि साथीला वाद्यवृंद असणार आहे. या श्रध्दांजली मैफलीचे आपल्या खास शैलीत निवेदनासाठी प्रसिद्ध असलेले मनिष गोखले निवेदन करणार आहेत. दि. ६ फेब्रुवारीला लाडक्या दिदीला जावून एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त लतादिदींना संगितमय मैफलीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित स्वरस्वती या कार्यक्रमात राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण असलेल्या कार्यक्रम सर्व रसिकांसाठी मोफत असेल. यासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. क्वालिटी वर्ल्ड, सत्यब्रम्ह भरित सेंटरच्या मागे, बी. जे. मार्केट, केवल हॉस्पिटल बजरंग बोगद्या जवळ, गणपती मंदिर शेजारी, मिसळ दरबार, मू. जे. महाविद्यालय समोर यामध्ये महिलांसाठी विशेष प्रवेशिका केवल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे

Leave A Reply

Your email address will not be published.