अखेर भंगार बाजाराने घेतला मोकळा श्वास !

0

पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले अतिक्रमण ; अजिंठा रस्त्यावरील अतिक्रमणही काढले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

महानगर पालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी  अडथळा ठरणाऱ्या एसटी वर्कशॉपजवळील भंगार बाजारचे अतिक्रमण आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत काढण्यात आले.एसटी वर्क शॉप पासून ते अंजिठा चौफुली तसेच महामार्गाचे चारही बाजूचे सुमारे 85 अतिक्रमीत टपर्‍या काढण्यात आल्या.

या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी मनपा आयुक्तांना प्राप्त झाल्या होत्या . तसेच नागरिकांनाही या अतिक्रमणाचा त्रास होत असल्याने मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी अतिक्रमण हटविण्याबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याशी बोलून पोलीस बंदोबस्ताबाबत नियोजन केले होते.अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक नारायण नस्ते, संजय ठाकूर यांच्यासह पथकाने तगडा पोलीस बंदोबस्तात अंजिठा चौक ते एस. टी. वर्क शॉप दरम्यान तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण कारवाईची करण्यात आली.

युट्युब लिंक👇

 

त्यानुसार आज सकाळी पोलीस बंदोबस्तात एसटी वर्कशॉप पासून ते अजिंठा चौफुली आणि भुसावळ रस्त्यावरील हॉटेल मुरली मनोहर पासून कालिंकामाता मंदिर चौकांपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले . अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले. तर अजिंठा रस्त्यावरील बाफना पाणपोईपासून ते बाजार समिती पर्यंत असणारे अतिक्रमण हटविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.