अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वकील ठार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार वकिलाला चिरडल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळील कार शोरूमसमोर घडली.ॲड. विवेक पाटील (वय ३५, रा. धरणगाव), असे मृताचे नाव आहे.

धरणगाव येथील रहिवासी ॲड. विवेक प्रकाश पाटील जिल्‍हा न्यायालयात वकिली करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकीने ते दररोज ये-जा करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते जळगावला आले होते. कामाच्या व्यापामुळे गुरुवारी उशीर झाल्याने रात्री साडेआठच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकी (एमएच १९, सीएच १३९६)ने धरणगावला निघाले.

राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळील कार शोरूमसमोरच ॲड. पाटील यांच्या दुचाकीला समोरून सुसाट वेगात येणाऱ्या वाळू डंपर (एमएच ०४, एसएस २०१४) जोरदार धडक दिली व पसार झाला. या अपघातात ॲड. विवेक पाटील जागीच ठार झाले. ॲड. विवेक पाटील यांच्या पश्चात सहा महिन्यांची मुलगी, पत्नी आणि आई, असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.