प्रभाकर आप्पा सोनवणेंच्या नातूचा अपघाती मृत्यू; सर्वत्र हळहळ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर आज भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बालक चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघ्या तेरा वर्षाच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हळहळले आहे. अपघात झालेल्या ट्रक वर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली असून घटनस्थळावर तणावपूर्ण शांतता आहे.

सुजय गणेश सोनवणे (वय 13) असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान मयत बालकाचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे, नगरसेविका रंजना प्रभाकर सोनवणे यांचे नातू व मोहाडीचे माजी सरपंच गणेश प्रभाकर सोनवणे यांचे सुपुत्र सुजय गणेश सोनवणे हा शेवटचा पेपर असल्याने सेंट टेरेसा इथे आपल्या शाळेत जात होता, या दरम्यान घरून निघाल्यानंतर मोहाडी रस्त्यावरच भरधाव वेगाने जात असलेल्या एम. एच 28 बी 7703 या ट्रक ने सुजय च्या एम.एच डिएम 111 या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सुजयचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

सुजय सोनवणे हा सेंट टेरेसा या शाळेत शिकत होता. शाळेत परीक्षा असल्याने पेपर देऊन तो घराकडे निघाला होता त्याच्या सोबत शिपाई राजू गवळी हा वाहन चालवीत होता. मात्र खड्डेमय रस्त्यावर वाहन घरसल्याने वाहनसह दोघे रस्त्यावर कोसळले. सुजय हा अतिशय हुशार तसेच गुणी स्वभावाचा होता. त्याचे अपघाती निधन झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.