पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाची मान्यता ; आरोग्य विद्यापीठ डिजीटल अभ्यासक्रम होणार सुरु

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक:  महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस सरकारने मान्यता दिली आहे. विद्यापीठ आवारात सुरु करण्यात येणा-या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाने मान्यता प्रदान केली असून संशोधनासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. डिजिटल स्वरुपातील अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

स्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना मिळणार आहे. गुणात्मक दर्जावाढीसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विविध उद्दिष्टये आणि नवीन योजना कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी दिली.

संशोधनासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याने विद्यापीठाचा आगामी अर्थसंकल्प संशोधन व विद्यार्थीकेंद्री असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीचे कुलगुरु  माधुरी कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला तर लेखा अहवाल डॉ. मिलिंद देशपांडे यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले.

याप्रंसगी अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संलग्नित महाविद्यालयांनी संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम सुरु करणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

विभागीय केंद्र सक्षम करणार

विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, संशोधन व विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ऐरोली येथील बांधकाम, नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील जमीन खरेदी व बांधकामे आदींचा समावेश आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या आवारात आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार हे मोफत पुरविण्यात येतात. त्यासाठी या अर्थसंकल्पात औषधे, वैद्यकीय साहित्य खरेदी, आरोग्य शिबिरांसाठी 15 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.