अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार… 30 जखमी..

0

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार… 30 जखमी.

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ;

मलकापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दि. 29 जुलै रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उडाण पुलावरती घडली. या धडकेत पाच प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एम एच 08 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून तीर्थयात्रा आटोपून हिंगोलीच्या दिशेने जात होती या ट्रॅव्हल्स मध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरील उड्डाणपूलावर समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चुराडा झाला. या अपघातात पाच प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पो.नी. अशोक रत्नपारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक , मलकापुर ग्रामीण पोलिस निरीक्षक एफ.सि.मिर्झा यांच्या अधिकारी व कर्मचारी सहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताबरोबर माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ,अनिल गांधी, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध नसल्याने माणुसकीचे दर्शन घडवत जखमींचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी स्थानिय नागरीकांच्या सहकार्याने पोलिसांच्याच वाहनाने जखमींना तात्काळ मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळाला पोलीस जिल्हा अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी,हायवे पोलीस मदत केंद्राचे अधिकारी कर्मचारी, शहर वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी अडकलेली वाहतूक सुरळीत केली, शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.