भीषण अपघात: बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसने  जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात दुचाकी बसच्या मागच्या चाकात आल्याने दुचाकीचा चुराडा झाला. जखमी झालेल्या महिलेला तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला होता.  यावेळी भुसावळ तालुका पोलीसांनी देखील घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मयत झालेल्या दुचाकीस्वाराची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.