दिवाळीत मोठा दिलासा, खाद्यतेल स्वस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

वाढत्या महागाईवर मोठा दिलासा मिळाला आहे. अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू असून खाद्यतेलाची आयात वाढलेली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.

 

सध्याचे तेलाचे भाव आणि गेल्या वर्षी दिवाळीतील तेलाचे भाव 

 

पाम :  १३५० ते १५०० रुपये  (२१०० ते २१५० रुपये)

 

सूर्यफूल : १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)

 

सोयाबीन :  १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)

 

सरकी :  १४०० ते १५५० रुपये ( २२०० रुपये)

 

वनस्पती तूप : १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)

 

शेंगदाणा :  २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये )

 

Leave A Reply

Your email address will not be published.