मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुसाट मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना दि. २३ रोजी रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दुचाकीस्वार एफडीलक्स मोटारसायकल (एमएच ३०, बीएन ४४६२)ने भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत होता. दरम्यान गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहने दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या प्रचंड वेगाने दुचाकीस्वार फेकला जाऊन अवजड वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख, गोविंदा पाटील, शुद्धोधन ढवळे, समाधान टहाकळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळ गाठले. मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात दाखल नेण्यात आला असून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली.

दरम्यान घटनास्थळी मृत तरुणाजवळ सापडलेला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मोबाईलला पॅटर्न लॉक असल्याने समोरून फोन आल्याशिवाय मृताची ओळख पटणे अशक्य असल्याने रात्री उशिरापर्यंत मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.