बांभोरी जवळ अपघातात तरुण जागीच ठार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महामार्गावरील (Highway) बांभोरी (Bambhori) येथे गिरणा नदीच्या (Girana River) पुलाजवळ पायी जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गुणवंत पाटील, रा.डोंबिवली, जि.ठाणे असे मृताचे नाव आहे.

आज सकाळी १० वाजता पुलाजवळ पायी चालत असतांना अचानक त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत चिरडले. या अपघाताची माहिती मिळताच, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले होते. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. गुणवंत पाटील या तरुणाजवळ दवाखान्याच्या (Hospital) उपचाराची कागदपत्रे (Documents) असलेली पिशवी मिळाली. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा त्याचे कुणी नातेवाईक (Relative) इथं असावेत असा अंदाज पोलिसांनी (Police) यावेळी वर्तविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.