वैद्यकीय अधीक्षकाला खंडणी मागितली; RTI कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील अट्रावल येथील वैद्यकीय अधीक्षकाला पन्नास हजारांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  प्रकरणी निमखेडी शिवारातील रहिवासी असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर (RTI activist) जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी (वय ३०) हे यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी असून सध्या ते जळगाव शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर येथे वास्तव्यास आहेत. डॉक्टर मयूर चौधरी हे १० सप्टेंबर रोजी रिंग रोड परिसरातील एका चहाच्या दुकानावर असताना या ठिकाणी त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी नोकरीत अडचण निर्माण होईल म्हणून तक्रार न करण्याबाबत तसेच त्रास होऊ नये म्हणून त्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.

दरम्यान या प्रकाराबाबत डॉ. मयूर चौधरी यांनी बुधवार १२ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली.सदर तक्रारीवरून माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे (वय ४०, रा. निमखेडी शिवार) यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तडवी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.