निलगायच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

बोदवड : शहरातील साळशिगी पुलाजवळ निलगायच्या धडकेने दुचाकीस्वार ठार दोन जण जखमी झाल्याची घटना दि. ६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. मोटारसायकल क्रमांक एम एच १९ डी एन ८८४७ या गाडीने मयत हरिचंद्र किसन चाकर रा. खळका येथून सकाळी कामासाठी बोदवड येथे अमर डेअरी मध्ये येत असताना निलगायीने (रोही) भुसावळ बोदवड रस्त्यावर साळशिगी दरम्यान पुलाजवळ दुचाकीला धडक दिल्याने मयत हरिचंद्र किसन चाकर याला डोक्यावर जबर मार बसला आणि मोटारसायकल घसरल्याने प्रमोद नामदेव पाडर व रितीक मनोज पाटील यांच्या दुचाकीवर आदळल्याने प्रमोद पाडर व रितीक पाटील हे दोन्ही गंभीर जखमी झाले त्याना तात्काळ पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मयत हरिचंद्र यास ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले त्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात वृध्द आई चार वर्षाची मुलगी सहा वर्षाचा मुलगा आहे या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याप्रकरणी बोदवड पोलिसात उखई दलपत महाजन यांच्या खबरीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.