मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

0

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गुन्ह्यातील (Crime) संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे एका पथकाची निर्मिती करून सापळा रचण्यात आला. दरम्यान या पथकाने सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.