मोठा दिलासा ! गॅस सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे (inflation) सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र या वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी आहे. आज नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) कमी झाले आहेत.देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात ही कपात झाली आहे. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आज 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले असले, मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

गॅस सिलेंडरचे नवीन दर 

मुंबई-  व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी यापूर्वी 1844 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता सिलेंडरसाठी 1696 रुपये मोजावे लागणार आहे.

दिल्ली-  19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये इतकी झाली आहे, जी पूर्वी 1859.5 रुपये होती.

कोलकाता-  व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1846 रुपये असेल. पूर्वी लोकांना 1995.50 रुपये मोजावे लागत होते.

चेन्नई-  व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1893 रुपये आहे. यापूर्वी यासाठी 2009.50 रुपये मोजावे लागत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.