Saturday, January 28, 2023

ब्रेकिंग.. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी (Maharashtra Political Crisis) पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 29 नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.  कोर्टात आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी 3 आठवड्यांचा वेळ मागतल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता 4 आठवड्यांनंतर सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे