धक्कादायक ; पोटातील गर्भ कापून काढत गर्भपात…

0

 

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क;

गर्भपात नावाचे भूत काहीकेल्या समाज कंटकांच्या व कुजलेल्या मानसिकतेच्या लोकांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव आजही घेत नाहीये. यामुळे कित्येक निष्पाप स्त्रियांना आपला नाहक बली द्यावा लागला आहे. आणि अजून कित्येकांचा अजून जायचा बाकी आहे? हा मोठा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच अवैधरीत्या गर्भपात करतांना एका महिएला आपल्या प्राणाला मुकाव लागलं होत. त्यातच काल पुन्हा अवैधरीत्या गर्भपाताचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत दोन्ही प्रकरणांची सीआयडी (CID) किंवा एसआयटी (SIT) मार्फत चौकशीची मागणी केली आहे.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदान बेटी बचाओ आंदोलन करत अवैध गर्भपाताची सीआयडी मार्फत चौकशी करा तसेच दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. कालच जिल्ह्यातील परळी शहरात गर्भपाताची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, दुसरी मुलगीच आहे म्हणून एका विवाहितेचा गर्भ अक्षरशः कापून काढण्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी घडला आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने सबंध महाराष्ट्र हादरला होता. या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, यापेक्षा भयानक अन् माणुसकीला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना ही परळी शहरात घडली आहे. शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या “सरस्वती नारायण वाघमोडे” या विवाहितेला मागील वर्षी एक मुलगी झाली. त्यानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली. यावेळी नवरा नारायण, सासू छाया वाघमोडे या दोघांनी गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह केला. सरस्वतीने याला विरोध केला तरीदेखील नवरा व सासूने डॉ. स्वामी यांना घरी बोलावून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले. यावेळी मुलीचा गर्भ असल्याचे कळल्यानंतर अवैध गर्भपाताचे इंजेक्शन त्या महिलेला बळजबरीने देण्यात आले. सरस्वतीला एक दीड तासाने त्रास होऊ लागल्यावर तिने ही घटना पुण्याला राहणाऱ्या भावाला कळवली. दरम्यान, डॉ. स्वामी यांनी अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने अक्षरशः सरस्वतीच्या पोटातील गर्भ कापून काढत गर्भपात केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर भावासोबत माहेरी गेलेल्या सरस्वतीने पोलिसात फिर्याद दिली असून नवरा, सासू आणि डॉ. स्वामी आणि अन्य एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.