पी.व्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक म्हणून निवडल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.’ यापूर्वी दुखापतीमुळे भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून (Birmingham 2022 Commonwealth Games) माघार घेतल्यानंतर उद्घाटन सोहळ्यात भारताची ध्वजधारक (Flagbearer) म्हणून  पी.व्ही सिंधूची (PV Sindhu) निवड झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएसनने आज या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

आयओएने सांगितले की, वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहैन यांचाही ध्वजधारक म्हणून विचार झाला होता. आयओएच्या अधिकृत वक्तव्यानुसार ‘सिंधूने रिओ ऑलिम्पिक 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक जिंकले होते. तिच्यासोबतच मीराबाई चानू आणि लोव्हलिना बोरगोहैन यांनी देखील ऑलिम्पिक पदक जिंकल्याने त्यांचाही विचार होणे गरजेचे होते. दरम्यान, चार सदस्यांच्या समितीने यात IOA चे प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना, सचिव राजीव मेहता आणि खजिनदार आनंदेश्वर पांडे टीम इंडियाचे मिशन प्रमुख राजेश भंडारी यांनी या तीन खेळाडूंची नावे शॉर्टलीस्ट केली होती. त्यानंतर खन्ना आणि मेहता यांनी  पी.व्ही सिंधू (PV Sindhu) ची निवड केली.

Leave A Reply

Your email address will not be published.