आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा यशस्वी; २२ दिवसांनी संप मागे

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या होत्या ८ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी ओवाळणी मोर्चा काढला होता तो यशस्वी झाल्याने २२ दिवसा पासून सुरु असलेले काम बंद आदोलन सुरु होते. तो संप मागे घेण्यात आले.

संपाच्या पार्श्वभूमीवर अप्पर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त, आरोग्य सेवा तसेच मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याबरोबर बैठकी होऊन चर्चा झाल्या.

वरीप्रमाणे झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्यासह भरीव मानधनवाढ करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दि.०१ नोव्हेंबर रोजी केली. परंतू निर्णय कधी घेतला जाईल याबाबत ठोस सांगितले नाही. म्हणून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता.

आरोग्य मंत्र्यानी केलेल्या घोषणेप्रमाणे भाऊबीज भेट आणि मानधनवाढीचा शासकीय आदेश(GR) दिवाळीपूर्वी काढावा. यासाठी दि. ०८.११.२०२३ रोजी राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी माया परमेश्वर आणि रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई येथे ओवाळणी मोर्चा काढला.

त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव श्री.लहाने यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा केली सदर चर्चेत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दोन हजार भाऊबीज भेट देण्याचा आणि गटप्रवर्तकांच्या सुधारित मानधन वाढीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच दिवाळी काळात निर्णय होईल तसेच समायोजन करण्यासंबंधी धोरणात्मक निर्णय होण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचेही लहाने यांनी शिष्टंडळाला सांगितले. शिष्टमंडळात रामकृष्ण पाटील यांच्यासह वैशाली ठाकरे, अरुणा देशमुख यांनी भागीदारी केली.

चर्चा समाधानकारक झाल्याने आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचा सुरू असलेला संप आजपासून मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी जाहीर केले. त्यामुळे सर्व आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी आपले नियमित कामकाज सुरू करावे असे आवाहन रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाने यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.