मोठी बातमी; ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित…

आता आयसीसीच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आधीच विश्वचषकात आपल्या निराशाजन कामगिरीमुळे दबावात असणार्या श्रीलंकेला आज आणखी एक मोठा धक्का ICC ने दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ICC चे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. विशेषत: श्रीलंकेत क्रिकेट त्यांचे व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करत नव्हते आणि त्यांच्या प्रशासनात त्यांचे सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले. निलंबनाच्या अटींबाबत आयसीसी बोर्ड योग्य वेळी निर्णय घेईल. या निर्णयामुळे त्यांना आता आयसीसीच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही.

 

याआधी विश्वचषकात खराब कामगिरीमुळे २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही ते पात्र ठरू शकले नाही. त्यात भरीस भर भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.