धाड टाकलेल्या “त्या” हॉटेल मालकावर गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरात अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यावर काल सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या पथकाने दोन हॉटेलवर छापा टाकला होता. त्यात २० चे वर तरुण तरुणींना हॉटेल मालकासह ताब्यात घेण्यात आले होते.

त्याच प्रकरणी हॉटेलचे मालक व व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली आहे. जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या हॉटेल हेरंब पॅलेसचे मालक पंकज वासुदेव बोरोले व व्यवस्थापक लोकेश राजेंद्र शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.