Monday, January 30, 2023

पोलिसांच्या तत्परतेने मिळाली साडेतीन लाखाचे सोने असलेली बॅग परत…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

प्रवासाच्या घाईगर्दी मध्ये आपण नेहमीच काहीनाकाही विसरत असतो. आणि त्याची आपल्याला नंतर आठवण येते, असं आपल्या सोबत बऱ्याचवेळा होत असत. मात्र जेव्हा आपल्या सामानाच्याच बॅग जर स्टेशनवर राहिल्या तर ? आणि विशेष म्हणजे त्यात तब्बल साडे तीन लाखाचे सोन्याचे दागिने असले तर? आपल काय होईल. अशीच एक घटना काल जळगाव रेल्वे स्टेशनवर घडली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील आव्हाणे गावातील रहिवासी दाम्पत्य अंकिता व सुनील चौधरी हे जळगाव रेल्वे स्थानकावरून काही नातेवाईकांसह आपल्या पालघर येथील नातेवाईकांकडे वास्तुशांतीच्या समारंभासाठी जायला निघाले होते. भुसावळ-बांद्रा एक्स्प्रेस मध्ये ते बसले, काही अंतर गेल्यावर त्यांना अचानक आपल्या दोन बॅग या स्टेशनवरच राहिल्याचे लक्षात आले. त्या बॅगेत तब्बल १५ ग्रॅम मंगळसूत्र, १९ ग्रॅमची एक सोन्याची चैन असे साडेतीन लाखांचे दागिणे होते. त्यांनी तत्काळ त्यांचे जळगाव शहरात राहणारे त्यांचे साडू ज्ञानेश्वर पाटील यांना सदर माहिती दिली. ज्ञानेश्वर पाटील यांनी तत्काळ जळगाव रेल्वे स्टेशन गाठले व रेल्वे पोलीसांना घटनेची माहिती दिली.

सदर माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यावर कारवाई करत हालचाली सुरु केल्या, आणि बॅगचा तपास करून व सर्व जबाब नोंदवून सदर बॅग या ज्ञानेश्वर पाटील यांच्या ताब्यात दिल्या. दोन्ही बॅग सुखरुप परत मिळाल्याने ज्ञानेश्वर पाटील रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे. रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामराव इंगळे व पोलीस शिपाई किशोर पाटील यांनी तत्काळ हे शोध कार्य केले. त्यांच्या या तत्परतेचे कौतुकही होत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे