कॉग्रेसच्या वाट्यावर ‘भाजप’

0

जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्षपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडीच्या सभेत व्यासपीठावर उपस्थितीत नेते पक्षनिरीक्षक केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन जिल्ह्याचे खासदार आमदार यांचे डोळ्यादेखत जिल्हा संघटमंत्री प्रा सुनील नेवे याना मारहाण झाली. त्यांच्या अंगांवर शाई फेकण्यात आली. अर्धतास सभेत गोंधळ चालू होता. कार्यकर्त्यांना शांत करताना गिरीश महाजन हतबल झाले होते. जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यातिल गटबाजी दिवसेंदिवस उफाळून येत आहे.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अमळनेर येथील सभेत व्यासपीठावरच तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचेवर जीवघेणा हल्ला केला.त्या प्रकरणानंतर नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हापरिषदेच्या सभापती निवडीचे सदस्यांनी गोंधळ घातला पक्षविरोधी बंड करण्याची धमकी दिल्यानंतर श्रेष्ठीनी अधिकृत जाहिर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करून बंडाचे हत्यार उगारलेल्या  सदस्यांची ऐनवेळी उमेदवारी घोषित केली. जिल्हा भाजपतील गटबाजीमुळे कार्यकर्त्यातिल असंतोष वाढीस लागला आहे.त्याचबरोबर राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांचा जिल्हा भाजपत दबदबा होता. गिरीश महाजन म्हणेल ती पूर्व दिशा अशी परिस्थिती त्यावेळी होती. परंतू सत्ता जाताच जिल्ह्यातील गटबाजीला उधाण आले.

साईडट्रॅकला असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसेचा गटहि सक्रिय झाला. स्वतः नाथाभाऊसुद्धा सक्रिय झाले. त्यांचा परिणाम नुकताच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत दिसून आले. संपूर्ण जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथराव खडसेची वर्चस्व निर्माण केले आहे.संकट मोचक गिरीश महाजन एक पाऊल मागे घ्यावे लागले. हे मात्र विशेष होय भाजप साधन सूचित पाळणारा पक्ष शिस्त पाळणारा पक्ष पक्षादेशाचे पालन करणारा पक्ष अशी आतापर्यंतची ओळख कॉग्रेस पक्षाची दयनीय अवस्था निर्माण होण्यास ६०वर्ष लागली. परंतु भाजप तर कॉग्रेस पक्षावरही मात करतेय कि काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येऊन अवघी पाच वर्षात सत्तेसाठी भाजपत जो गोंधळ व्हायला आहे ते पाहता कॉग्रेसलाही तो लाजविणारा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार  नाही. कारण भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेत कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ जिल्हा संघटक सरचिटणीस केलेली मारहाण आणि त्यांचे अंगावर फेकलेली शाही हा प्रकार निदनीय निषेधार्ह असल्याचे खुद्द गिरीश महाजन यांनी म्हटले आहे सत्तेसाठी भाजपचे कार्यकर्ते या थराला जाऊ शकतात हे यावर विश्वासच बसत नाही.हा सर्व प्रकार पाहून पक्षाचे निरीक्षक केंद्रीय राज्यमंत्री माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सभा सोडून निघून जाण्याच्या तयारीत होते. जळगाव जिल्हा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत जिल्हाध्यक्षपदि निवड झालेले माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचेसह १८ जण होते. त्यात भुसावळचे अजय भोळे कार्यकारी अध्यक्ष डॉ संजू पाटील पोपट भोळे पी सी पाटील आ स्मिता वाघ आदींच्या नावाचा समावेश होता. यापैकी निवड एकाचीच होणार असली तरी ती लोकशाही पद्धतीने रीतसर होणे अपेक्षित असते.

जिल्हाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रिया आधी कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच विषयावरून गोंधळ  घातला पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री प्रा सुनील नेवे हे भुसावळचे पक्षाच्या शहराध्यक्षपदी आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड प्रा नेवे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याची केली असून ते मनमानी कारभार करतात असा आरोप करणारे निवेदन प्रथमत पक्षनिरीक्षक रावसाहेब दानवे याना देण्यात आले. त्यानंतर भुसावळ च्या काही विशिष्ट कार्यकर्त्यांनी प्रा सुनील नेवे याना मारहाण केली. त्यांच्या अंगावर शाई फेकली. या प्रकारांमुळे सभेत जोरदार गोंधळ सुरु झाला. खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळाबद्दल व्यासपीठावरील श्रेष्ठीनि कारवाई करतील तेव्हा करतील परंतु ज्यांना मारहाण झाली ते प्रा सुनील नेवे हे गेल्या तीन दशकापासून भाजपचे एकनिष्ठ कार्य करणारे कार्यकर्ते आहेत. प्रा नेवे यांनी पक्षसंघटनेचे कार्य एकनिष्ठपणे करतात गेल्या वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असली तरी सत्तेची त्यांना मस्ती आलेली नाही या मारहाणी संदर्भात नेवेनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती पक्षश्रेष्ठीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. मला मारहाण झाली असली तरी मी त्याला भीक घालणारा नाही कारण मी कुठला ठेकेदार नाही अथवा दोन नंबरचे कामे मी करीत नाही  उलट दोन नंबरची कामे मी  करू देणार नाही. याचा अर्थ गोंधळ घालणाऱ्या विशिष्ट कार्यकर्त्यावर प्रा सुनील नेवे यांचा रोख आहे. त्यांचेवर वेगळया पद्धतीने त्यांनी निशाणा साधला आहे. नेवे म्हणतात या प्रकार दुर्दैवी व निदनीय असला तरी या घटनेमुळे पक्षकार्य करण्याची माझी उभारी वाढली आहे. प्रा सुनील नेवे यांच्या या वक्तव्याचा श्रेष्ठीकडून गंभीर दखल घेण्याची गरज आहे आणि ते घेतीलहि पक्षशिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्यावर त्वरित कारवाई झाली तर पक्षातील इतर कार्यकर्त्यावर त्यांची जरब बसू शकते परंतु गटबाजीमुळे अनेकवेळा कारवाई होत नाही. माजी आमदार डॉ बी एस पाटलांना व्यासपीठावर मारहाण करणाऱ्या उदय वाघ व त्यांच्या कार्यकर्त्यावर कारवाई झालीच नाही. विधानसभा निवडणुकीत युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्याविरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याची हिमंत  वाढते पक्षात असे प्रकार घडतात प्रा नेवे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई केली जाते काय ?याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.