जे करायचे आहे ते ठरवा, जे ठरवलंय ते करा …! सोमनाथ राठी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व ASP कार्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांसाठी ‘प्रश्न मनाचे…. आपल्या आयुष्याचे…!’ याविषयावर मानसिक स्थास्थ जपण्याच्या व दैनंदिन तणावपुर्ण जीवनातून मुक्त होण्याच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध वक्ते सोमनाथ राठी यांचे मार्गदर्शन व मुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात सर्व पोलीस बांधवांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊन मुक्त संवाद साधला.

यावेळी प्रामुख्याने Unconditional love, self respect, आनंदी जीवनाची चावी या सारख्या संवेदनशील विषयावर सोमनाथ राठी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उप पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, चाळीसगाव शहर पो.नि.विजय ठाकूरवाड, चाळीसगाव ग्रामीण पो.नि. प्रताप शिकारे, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे, डॉ.संदीप देशमुख व सचिव रोटे, रोशन ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चाळीसगाव रोटरी ने 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल प्रथमच रोटरी  दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर आयोजित रोटरी क्लब ऑफ चाळीसगावच्या ‘सुदृढ आरोग्य सर्वांसाठी…’ या मोहिमे अंतर्गत सर्व पोलीस बांधवांच्या १५ हुन अधिक तपासण्या करण्यात आल्या तसेच नेत्र रोग, कान-नाक- घसा, हृदयरोग तपासणी, पोटाचे व मूळव्याध तपासणी, फुफ्फुसासंदर्भातील तपासण्या, निदान व उपचार करण्यात आले. ६० हुन अधिक पोलीस बांधवांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी डॉ.सुधानवा कुलकर्णी, डॉ. अभिजित राखुंडे, डॉ. तन्वी पाटील, डॉ. साहू, डॉ. योगेश पाटील आदी तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले तसेच  रोटरी क्लबचे सर्व सदस्यांनी व सर्व पोलीस अधिकारी यांनी विशेष सहकार्य व   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

अध्यक्षीय मनोगतात असे भरीव उपक्रम ही काळाची गरज असून, नेहमी कामाच्या तणावात वावरणाऱ्या आम्हा पोलिसांना या पद्धतीने शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी रोटरी चाळीसगाव परिवाराकडून मिळालेल्या सौहार्द उपक्रमाने खूप आनंद झाला असल्याच्या भावना सचिन गोरे यांनी व्यक्त केल्या. तर रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव नेहमीच विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा वसा जोपासत असते, व समाजातील प्रत्येक घटक हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ व्हावा यासाठी प्रयत्न शील राहू असे प्रतिपादन आभार प्रदर्शन करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.