शिवसेना आमदाराच्या गाडीला भीषण अपघात ; ३ जण गंभीर

0

बुलडाणा : मेहकर विधानसभा मतरदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. नायगाव दत्तपूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या ४०७  या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने पलटी झाली. यामध्ये आमदार रायमुलकर यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि वाहन चालक हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रायमुलकर यांची गाडी मेहकरकडे येत असताना त्यांच्या इकोस्पोर्ट गाडीची आणि ४०७ ची समोरासमोर धडक झाली.  ही धडक इतकी भीषण होती की, यात आमदारांची गाडी पलटी झाली. त्यासोबतच मेटॅडोर ट्रकही पलटी झाला.

दरम्यान सध्या आमदार संजय रायमुलकर, चालक पंजाम गुडधे आणि बॉडीगार्ड ज्ञानेश्वर निकस यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहेत. तर इतर बॉडीगार्डला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या औरंगाबाद येथील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.