पारोळा पत्रकार संघाच्या वतीने स्व:मुकेश गुजराथी यांना मदत

0

पारोळा- पारोळा शहरातील वृत्तपत्र विक्रेता  मुकेश गुजराथी काही दिवसांपूर्वी त्यांचे  अल्पशा आजार ने निधन झाले, त्यांनी मागील पन्नास वर्षापासुन पारोळा शहरात वृत्तपत्र वाटून पारोळेकरांना सेवा दिली, व सर्व पत्रकारांना नेहमीच सहकार्य केले आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून  पारोळा शहरातील दर्पण पत्रकार संघाच्या वतीने स्व: मुकेश गुजराथी यांच्या वारसांना संघटनेच्या वतीने रोख रक्कम दहा हजाराची मदत  करण्यात आली,

या प्रसंगी पारोळा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी आपली भावना व्यक्त करत सांगितले की  स्व;मुकेश गुजराथी यांनी खुपच मेहनत घेतली व जीवनाच्या शेवट पर्यंत अथक परिश्रम घेतले होते, त्याच्या जाण्यामुळे पत्रकारांची ही हानी झाली आहे, ते रोज गल्लोगल्ली आमचे वृत्तपत्र पोहचवण्यासाठी मेहनत घेत असत, अश्या भावपुर्ण शब्दात स्व: मुकेश गुजराथी याना पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली वाहीली, या प्रसंगी पारोळा शहरातील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, तसेच  पारोळा दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक  विजय नावरकर,अध्यक्ष रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष योगेश पाटील, तसेच पत्रकार रमेशकुमार जैन, अभय पाटील, अशोक कुमार लालवानी, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेता निंबा मराठे, प्रेस फोटोग्राफर संजय चौधरी, याच्या सह मुकेश गुजराथी यांचे मोठे बंधु  किशोर गुजराथी, व स्व:मुकेश गुजराथी यांचे चिरंजीव दिपक गुजराथी ,तसेच त्यांच्या पत्नी मधुबाला गुजराथी, व समाजातील प्रतिष्ठीत नागरीक  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.