एरंडोल येथे आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

0

एरंडोल, प्रतिनिधी – येथे मैत्री सेवा फाउंडेशन संचलित कल्पतरू वाचनालय अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी भव्य दुमजली वाचनालय बनविण्याच्या उद्देशाने या अभियानाच्या प्रथम चरणाच्या सांगते प्रसंगी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन एरंडोल येथे प्रथम होत असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता लागुन आहे.

 हे कीर्तन (दि.११) शनिवारी शहरातील रा.ति.काबरे विद्यालयाच्या प्रांगणावर सायंकाळी ४ ते ७ वाजता होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.