6 हजाराची लाच; वैद्यमापन शास्त्र निरीक्षकास घेतले रंगेहात ताब्यात…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पहूर येथील जय बालाजी नावाचा पेट्रोल पंपाच्या मालकाकडून पेट्रोल पंपावरील नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागणाऱ्या वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील 49 वर्षीय तक्रारदार यांचा जय बालाजी नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावरील चार झोनल मशीला स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी दिड हजारांप्रमाणे सहा हजारांची लाच पाचोरा शहरातील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक (Inspector of Metrology Department) विवेक सोनु झरेकर (54), रा.पुनगाव रोड, पाचोरा यांनी मंगळवारी मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला. व पहूर-जळगाव रोडवरील हॉटेल अजिंक्य येथे संबंधित आरोपी निरीक्षकास लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली.

ए. सी. बी. च्या पथकाने सापळा रचून वैद्यमापक शास्त्र विभागाचे निरीक्षक विवेक झरेकर यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे डी. वाय. एस. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. बच्छाव व एन.एन. जाधव, पोलिस नाईक ईश्वर धनगर, पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलिस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.