धक्कादायक; एक कोटीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पसार…

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भुसावळ शहरातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पळूनगेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनेजर हा युपी येथील रहिवासी असल्याचे समजते.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील पांडुरंग टॉकीज भागात मणपुरम गोल्ड बँक असून सोने तारण ठेवून बँकेतर्फे ग्राहकांना लोन देण्यात येते. या बँकेचे सुमारे २१०० ग्राहक असून त्यातील काही ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. संबंधित आरोपी हा या बँकेत दोन महिन्यांपूर्वीच मॅनेजर पदावर नियुक्ती झाली होती. मात्र संबंधिताने बँकेतील लॉकरमधून सुमारे दोन किलोहून अधिक सोने चोरून नेल्याचा संशय बँक प्रशासनाने व्यक्त करीत पोलिसांकडे त्याबाबत तक्रार केली आहे.

या सोन्याचे किंमत बाजारभावानुसार एक कोटी रुपयांहून अधिक आहे. याबाबत तपासासाठी ऊपविभागाय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद होईल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.