पाचोरा हादरले… १४ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार;

सात आरोपींसह तिन संशयित ताब्यात....

0

 

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील १४ वर्षीय युवतीवर सात तरूणांनी अत्याचार करत शारिरिक सबंध ठेवल्याने पिडित युवतीला गर्भधारणा झाली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या अल्पवयिन युवतीच्या ६५ वर्षीय आजीने पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ६ मे रोजी सात जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आसुन त्या सात जणांसह तीन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाचोरा पोलिसांकडुन या प्रकरणी मिळालेली माहीती अशी की, सदर पिडित तरूणी ही २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती. २८ एप्रिल रोजी तीच्या आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीचा शोध घेतला असता, ती २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हाॅटेलमध्ये जेवण करतांना आढळुन आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी तीची चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समीतीकडे रवानगी केली. दरम्यान बाल कल्याण समीती येथील प्रशासकिय यंत्रणेने सदर युवतीची वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाचोरा पोलिसांना माहीती कळवली. माहिती मिळताच उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे युवतीची विचारपूस केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचे कथन केले. यात पिडितेने सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरूणणांनी वेळोवेळी विनयभंग करित शारिरिक सबंध ठेवल्याचे सांगितले. आरोपींना ओळखण्यासाठी पिडितेने सातही तरूणांची ओळख पटवली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणात अजून तीन तरुणांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

पिडित तरूणीही ही अल्पवयीन असल्याने तिची ६५ वर्षीय आजीने दिलेल्या फिर्यादिवरून पाचोरा पोलीस स्टेशन गु. र. नं. १२०/२०२३ भादवी कलम ३६३ व वरीष्ठांचे मार्गदर्शनाने भादवी कलम ३७६ (अ) (ब), ३७६ (ड) (ब), ३७६ (२) (एन), ३५४, सह पोस्को अँक्ट कलम ४, ६, ८, १२ सह अ. जा. ज. अत्य. प्रति. अधि. का. क. ३ (१) (W) (I) (II), ३ (२) (V) असे वाढीव कलम समाविष्ठ केले असुन सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा अभयसिंग देशमुख हे करीत आहे. पिडित तरूणी आणि ताब्यात घेतलेल्या तरूणांची वैद्यकिय तपासणी केल्यावर या प्रकरणातील खरे आरोपी आणि सत्यता समोर येईल. मात्र या घटनेमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली असुन पालकवर्गात भितीचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.