14 ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून साजरा होईल; मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी  फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत 14 ऑगस्टला ‘फाळणी भयावह स्मरण दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

 

#PartitionHorrorsRemembranceDay हा दिवस आपल्याला भेदभाव, द्वेष आणि वैर या विषाला नष्ट करण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवी संवेदना मजबूत करण्यासाठी मदत करेल. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली. देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस उद्या साजरा केला जाणार आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.