सोने- चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जागतिक बाजरपेठेतील कमकुवत संकेतांमुळे आज सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.  अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर या महिन्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर वायदा सोने 0.13 टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 1 टक्क्यानं घसरल्या. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचे भाव 0.16 टक्क्यांनी घसरले होते, तर चांदीचे भाव 1.76 टक्क्यांनी कमी झाले होते.

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी कमी झाली. या आठवड्याच्या शेवटी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध आहेत. स्पॉट सोने 0.1% घसरून 1,752.66 डॉलर प्रति औंस झाले.

आजची सोन्याची नवी किंमत 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत 58 रुपये किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 45,928 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.1 टक्क्यांनी घसरून 1752.66 डॉलर प्रति औंस झाले.

आजची चांदीची नवी किंमत 

दुसरीकडे एमसीएक्सवरील डिसेंबर वायदा चांदी 565 किंवा 1 टक्क्यांनी घसरून 59,427 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 22.33 डॉलर प्रति औंस झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.