शहरात दिवसाढवळ्या वाळू वाहतूक; एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर झाले पलटी.. (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयासमोर वाळून भरलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे चाक निघाल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. वाळूच्या वाहतूकीला परवानगी नसतांना वाळू वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

जळगाव शहरातील स्टेट बँक ते नवीन बी.जे. मार्केट दरम्यान असलेल्या आर.आर. विद्यालयाजवळ वाळूने भरलेला ट्रक्टर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रॉली सहीत जात होते. दरम्यान रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात अचानक ट्रॉलीचे चाक गेल्याने पडलेल्या खड्डयामुळे ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकाचे एक्सल तुटला. त्यामुळे चाक निखळल्याने अपघात झाला.

दरम्यान हे वाळूचे ट्रॅक्टर कुणाचे आहे? हे अजून समजू शकले नाहीय. तसेच शहरात वाळूच्या वाहतूकीला पुर्णपणे बंद असतांना भरदिवसा अवैध वाळूची वाहतूक होत आहे हे या वरून दिसून येत आहे. याकडे महसूल प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.