नजर आणेवारी कमी करावी, सरसकट दुष्काळी अनुदानासाठी काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यात पावसाच्या सुरवातीचे दीड महिना पाऊस पडल्याने पेरणी साधारणतः १५ जुलैला झाली, त्यानंतर पाऊसात मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व उत्पन्नावर परिणाम झाला.  पुन्हा १८ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली.  व तो सतत कमी जास्त प्रमाणात १६ सप्टेंबरपर्यंत रोज पाऊस येत राहीला.

त्यामुळे खरीपातील पिके ऊभवणेस (मर रोग) सुरुवात झाली. ज्वारी बाजरी, मका, कापूस पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.  पिकांवर रोगराई पसरली तसेच जास्तीचा खंड नंतर सततचा पाऊस यामुळे कापसाच्या पिकांवर लाल्या रोग बोंड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पन्न नगण्यच येणार आहे, तरी आपण लावलेली ५२ पैसे नजर आणेवारी ही अवास्तव असून ती कमी करावी व सरसकट नुकसान भरपाई अनुदानासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे. असे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी तर्फे देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, कार्याध्यक्ष संभाजी पाटील, प्रा.शाम पवार, प्रताप पाटील, प्रविण जैन, महेश पाटील, तौसिफ तेली, राजेंद्र भाट,अलीम मुजावर, सुरेश पाटील, बन्सीलाल भागवत, मयुर पाटील, कलवंत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.