सप्तशृंगी नगरात शिक्षकाच्या घरात चोरी

0

चाळीसगाव- शिक्षक दांपत्य शाळेवर गेल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने असा एकुण 66 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दि 2/12/2019 रोजी सकाळी 11-30 ते सायंकाळी 5-30 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील टाकळी प्र चा येथील सप्तशृंगी नगरातुन चोरुन नेला असुन चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार सुनिल भिकनराव चव्हाण (49) रा सप्तशृंगी नगर टाकळी प्र चा ता चाळीसगाव व त्यांच्या पत्नी हे दोघे जण शिक्षक असुन दोघे जण नेहमीप्रमाणे दि 2/12/2019 रोजी सकाळी 11-30 वाजेच्या सुमारास शाळेत गेले होते सायंकाळी 5-30 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी शाळेतुन घरी आल्या असता घराचा दरवाजा तुटलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी लागलीच माहिती सुनिल चव्हाण यांना दिल्यावर ते घरी येवुन पोलीसांना पाचारण केले तेव्हा  घरातील कपाट बघीतले असता त्यातील 18 हजाराच्या 10 ग्रॅम सोन्याच्या लहान मुलाच्या 12 अंगठ्या, 9 हजाराचे 5 ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, 12 हजार 600 रुपयांचे 7 ग्रॅम सोन्याचे लॉकेट, 3600 रुपयांचे 2 ग्रॅम सोन्याचे पेंडल, 12 हजार 600 रुपयांची 7 ग्रॅम सोन्याची चैन, 5400 रुपयांच्या 3 ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, 1500 रुपयांचे 50 ग्रॅम चांदीचे कडे व 3 एटीएम कार्ड व 4 हजार रुपये रोख असा एकुण 66 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गु र न 349/2019  कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.