मृत तरुणाची ओळख पटली

0

यावल – कोळन्हावी तालुका यावल तापी पुलावरून जळगाव तालुक्यातील पिंपळा येथील दिलीप मोहनसिंग पाटील वय 35 या इसमाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या संध्याकाळी साडेसहा वाजेची घटना घडली.

यावल पोलीस घटनास्थळी पोहोचलेसदरचा इसम हा जळगाव येथील असल्याचे समजले पोलिसांनी आत्महत्याग्रस्त इसमाची प्रेत ताब्यात घेतले यावेळी पोलीस पाटील कैलास सोळुंके तसेच गावातील अण्णा सोळुंके देविदास सोळंके राजेंद्र सोळंके विकास सोळंके दीपक सोळुंके यांनी त्याला नदीपात्रातून काढून वर आणण्यासाठी मदत केली पोलीस पाटील कैलास सोळुंके यांच्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर 68 / 19 ’ सीआरपीसी 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे व यावलग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे याबाबत पुढील तपास पी आय यावल पोलीस स्टेशन रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील तायडे हे करीत आहेत मयत दिनेश याला एक मुलगी असून आई पत्नी एक लहान भाऊ असा परिवार आहे त्याचा लहान भाऊ कोपरगाव येथील कोर्टामध्ये स्टेनो असून त्याचे नातेवाईकांनी रात्री यावल पोलीस स्टेशनला दहा वाजता येऊन मैत्रीची ओळख करून घेतली मयत दिनेश याचे शवविच्छेदन सकाळी यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.