बहिणाबाई स्मृतिदिनानिमित्त अहिराणी भाषा दिन साजरा

0

चोपडा – निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलला आज अहिराणी भाषा दिन संपन्न झाला.

राष्ट्रसेवा दलाच्या संकल्पनेतून खानदेशी अहिराणी बोलीच्या संवर्धनासाठी बहिणाबाई चौधरींचा स्मृतिदिन अहिराणी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी प्रयत्न झाले त. तेव्हा या राष्ट्रसेवादलाच्या संकल्पनेनुसार तांदळवाडी हायस्कूलला आज मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शाळेत दिवसभर अहिराणी बोलणं व अहिराणीतून अध्यापन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच त्यांनी त्यांचा खुमासदार वात्रटिका, विनोदी किस्से, सुंदर विडंबनांचा ‘अहिराणी हास्यभेळ’ हा कार्यक्रम सादर केला.  प्रथम कवयित्रीबहिणाबाई चौधरींच्या काव्य प्रतिभेचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी’ ती सांगस मन्हा कुकू साठे मी इतलं पथपाणी पायस त्यास्नी शुगर वाढाना धाक मामी गोड बोलनं भी टायस’ मोजीसन 2 सावा घंटा वाजाडे एक धल्ला मंदिर मा येता जाता मांघेतून समजनं तो धल्ला म्हणे रिटायर्ड कंडक्टर होता’ या सम काही हलक्या फुलक्या वात्रटिका तसेच ’सरावनना महिनामा बंद शे इसडं खाणं उपास तापासकन मन्हं किदरनं मन’, देख वं मीना ऐक वं जना नही चढावत मन्हकन जीना’ व ’आरे टक्कल टक्कल ’ सारख्या विडंबनांनी तसेच मन्ही कोंबडी रोज एकच अंडदेस, याम्हा काय ईशेष, मगं तू जास्त दी दाखाड’ अशा विनोदी बोलण्याच्या त-हा सारख्या प्रचंड हास्याच्या फवार्‍यांनी विद्यार्थ्यांना हसून लोटपोट केले. शेवटी ’मन्ही अहिराणी माय जशी दूधवर साय व्हा कितलाबी मोठा तिन्ही तोडू नका नाय ’ अशा शब्दात अहिराणीचे नाते जोपासा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कला शिक्षक एन्.पी. पाटील यांनी तर प्रास्ताविक व आभार क्रीडा शिक्षक शिवाजी सांळुंखे यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक अरुण चव्हाण, इंद्रायणी पाटील, संदीप लांडगे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.