लालपरीचा संप; सुट्टीत विदर्भ, प. महाराष्ट्र, मराठवाड्यात गेलेल्या प्रवाशांचा मनस्ताप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काही भागात गेल्या दहा दिवसापासून सुरुच असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

संपाची तीव्रता आणखी वाढतच असल्याने दिवाळीसाठी मुंबई महानगर, पुणे व अन्य काही भागातून पश्चिाम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात गेलेल्यांचे परतीच्या प्रवासात हाल होण्याची शक्यता आहे. आधीच संपामुळे खासगी प्रवासी वाहतुकदारांनी चढ्या भावाने सुविधा उपलब्ध करून दिली असून आताही प्रवाशांना भूर्दंड सहन करून खासगी कं पन्यांना विनवण्या करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. राज्यातील विविध विभागातील ५९ आगारे शुक्रवारी बंद होती. ती संख्या वाढून शनिवारी ६५ पर्यंत पोहोचली.

गेल्या दहा दिवसांत बीड, वर्धा, सांगली, नांदेड, लातूर, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागात त्याची तीव्रता अधिक आहे. ८० ते ८५ टक्के सेवा सुरु असल्याचा दावा महामंडळाने के ला असला तरीही तीव्रता वाढत गेल्याने वाहतूक सुविधा विस्कळीत झाली आहे.

संप सुरु असलेली काही आगारेही तोट्यातच आहेत, त्यामुळे आणखी काही दिवस बंद ठेवून काहीशी कळ सोसण्याचा विचार महामंडळ करत आहे. त्यासाठी संप सुरु नसलेल्या जवळच्याच आगारातून जादा वाहतुक सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल. परंतु यामुळे अन्य आगारांवरील कर्मचाऱ्यांवरही आता कामाचा ताण येणार आहे.

संपूर्ण नियोजन विस्कटले

दिवाळीनिमित्त २९ ऑक्टोबरपासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाने राज्यभरात दररोज एक हजार जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. मात्र संपामुळे हे नियोजन बिघडले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई महानगर, पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात विदर्भ, पश्चिाम महाराष्ट्र, मराठवाडात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.

संपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असल्याने रविवारपासून सुरु होणाऱ्या परतीच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परतीच्या प्रवासात एसटीचे वेळापत्रक कोलमडू नये यासाठी महामंडळाने बसगाड्यांचे नियोजन केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

इतके झाले नुकसान

संपामुळे महामंडळाचे नुकसान वाढत असून आतापर्यंत ३६ कोटी रुपये नुकसान झाले आहे. तर २८ ऑक्टोबरआधी दररोज १९ ते २० लाख असलेली प्रवासी संख्या १५ ते १६ लाखांपर्यंत घसरली आहे.

खासगी वाहतूकीवर अवलंबून

‘राज्यातील काही भागात ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरु झाल्याने प्रवाशांना खासगी बस वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.

‘परतीच्या प्रवासासाठी अनेकांनी आधीच एसटीचे आरक्षण केले असून संपामुळे वाहतुकीत अडथळा आल्यास भाडेवाढ केलेल्या खासगी बस गाड्यांशिवाय प्रवाशांना पर्याय राहणार नाही. त्यातच रेल्वेगाड्यांनाही प्रतिक्षा यादी असल्याने मोठी अडचण आहे.

सोमवारी आम्ही उच्च न्यायालयात आमची बाजू मांडणार आहोत. त्यावर न्यायालयाचे काय म्हणणे आहे ते कळेलच. विलीनीकरण हा काही छोटा मुद्दा नाही. त्यासाठी अनेक परवानग्या आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते हे समजूून घेणे गरजेचे आहे.

– अनिल परब, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.