पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

0

वॉशिंग्टन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या डेटा इंटेजिलन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, मोदींना मिळालेल्या रेटिंगमध्ये , मोदींनी जगातील १३ प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. ५ नोव्हेंबरला हे अपडेट करण्यात आले. यात पंतप्रधान मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग हे ७० टक्के आहे.

नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, मॅक्सिकन राष्ट्रपती आंद्रे मॅनुएल लोपेज, इटलीचे पंतप्रधान मारियो दाघ्री, जर्मनचे चान्सलर एंजेला मर्केल यांच्यासहित अनेक बड्या नेत्यांना लोकप्रियतेत मागे टाकले आहे.

नेत्यांना मिळालेलं रेटिंग –

नरेंद्र मोदी- ७० टक्के

लोपेज ओब्राडोर- ६६ टक्के

मारियो ड्रैगी- ५८ टक्के

एंजेला मर्केल- ५४ टक्के

स्कॉट मॉरिसन- ४७ टक्के

जस्टिन ट्रूडो- ४५ टक्के

जो बिडेन- ४४ टक्के

फुमियो किशिदा- ४२ टक्के

मून जे-इन- ४१ टक्के

बोरिस जॉनसन- ४० टक्के

पेड्रो सांचेज़- ३७ टक्के

इमैनुएल मैक्रों- ३७ टक्के

जायर बोल्सोनारो- ३५ टक्के

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकप्रियतेत घसरण द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजनची कमतरता आणि अनेक ठिकाणी औषधांचा पुरवठा नसल्याने आणि हॉस्पिटल्समध्ये बेड नसल्याचे जनता मोदींवर नाराज होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि बिर्टनचे पंतप्रधान पिछाडीवर यंदाच्या या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पाचव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी पोहचले आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान आठव्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर पोहचले आहेत.

मे २०२० मध्ये मोदींना सर्वाधिक ८४ टक्के रेटिंग कोरोनाच्या पहिल्या लाटेतून बाहेर पडत असताना मे २०२० मध्ये नरेंद्र मोदींना सर्वाधिक रेटिंग होते. नंतरच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मोदींचे डिसअप्रूव्हल रेटिंग वाढले होते. त्यानंतर आता यावर्षी जूनमध्ये मोदींचे अप्रूव्हल रेटिंग पुन्हा वाढून ६६ टक्क्यांवर आले आहे. मोदींचे डिसअप्रूव्हल रेटिंग २५ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यांना सर्वाधिक कमी डिसअप्रूव्हल रेटिंग आहे.

सात दिवसांच्या सरासरीनंतर हे रेटिंग काढण्यात येते. एकूण गणितात १ ते ३ टक्क्यांचे कमी जास्त मार्जिन असते. हे आकडे ठरवण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टने देशातील २१२६ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यावरुन हे रेटिंग ठरविण्यात आले आहे.

मॉर्निंग कन्सल्ट काय आहे? 

मॉर्निंग कन्सल्ट अमेरिकास्थित राजकीय डेटा इंटेलिजन्स कंपनी आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील या 13 राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा केली जाते. तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेतलं जातं. तसेच निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटाही ही कंपनी प्रदान करते.

Leave A Reply

Your email address will not be published.