महावितरण ठाणे मंडळ कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शने

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महावितरणच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महावितरण मधील विविध कामगार संघटनांनी ठाण्यातील महावितरणच्या विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज महावितरणच्या विविध संघटनांनी  एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणच्या इंटकची वीज कामगार, कामगार सेना, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटना, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स या संघटना आज एकत्र येत प्रशासकीय कामकाजा विरोधात निदर्शने केली.

या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण यांनीही या निदर्शने आंदोलनात सहभाग घेत ठाणे मंडल अधिक्षक अभियंता अरविंद बुरपुल्ले, कार्यकारी अभियंता  माने व एच.आर. मॅनेजर रसिका भोळे यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करित कारवाईची मागणी केली. याप्रसंगी बोलताना कृती समितीचे निमंत्रक व इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. संदिप वंजारी यांनी सागितले की, प्रशासकीय परिपत्रक 514 नुसार प्रशासन निर्णय न घेता फक्त कागदी घोडे नाचवून आपल्या मर्जीनुसार काम चालू असल्याचा आरोप केला परिपत्रकाचा अनादर करित काही निर्णय होत असून वारवार निदर्शनास आणून देखील प्रशासन दखल घेत नसल्यामुळेच आज हे आंदोलन नाईलाजास्तव करण्यात आले असल्याचे सांगितले.

या प्रसंगी बोलताना इंटकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सागितले की, प्रशासन जाणूनबुजून काही मर्जीतील कामगाराना व अधिका-यांना पाठीशी घालून इतर संघटनांच्या मागणीला केराची टोपली दाखवत असून आता महावितरण कामगार हे सहन करणार नसल्याचे सांगितले. या निर्देशनाबाबत वीज कामगार सेनेचे विनायक जाधव, कामगार महासंघाचे रमेश नाईक, स्वाभिमानी वीज वर्कर्स  युनियनचे विवेक महाले व महावितरणच्या मागासवर्गीय संघटनेचे  दिलिप वाघमारे यांनी आपले विचार मांडले. आजच्या या निदर्शनानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर “चलो प्रकाशगड” हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  या निदर्शनास मोठ्या संख्येने महावितरणचे कामगार सहभागी झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.